शिरुर दिनांक ( वार्ताहर्) शिरूर शहरामध्ये मध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे 24 वाहन चालकावर कडक कारवाई करून 35,000 हजार रुपये दंड वसूल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिली . याबाबत आधिकची माहिती देताना पोलीसांनी सांगितले की ही कारवाई ही एसटी स्टँड परिसर,बीजे कॉर्नर,सी टी बोरा कॉलेज रोड ,निर्माण प्लाझा इथे करण्यात आली. ट्रिपल सीट,विना लायसन गाडी चालविणे,विना नंबर प्लेट,ब्लॅक फिल्मलिंग यांचे वर कारवाई करण्यात आली असून या प्रकारच्या कारवाया नियमितपणे केल्या जाणार आहेत वाहतूक नियमाचे उल्लंघन होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी असे आवाहन ही करण्यात आले आहे . ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अभिजित पवार, अनिल चव्हाण,पोलीस अंमलदार शेखर झाडबुके,वीरेंद्र सुम्बे ,अर्जुन भालसिंग,महिला अंमलदार भाग्यश्री जाधव व चार होमगार्ड यांच्या पथकाने केली .