शिरूर दिनांक (वार्ताहर) शिरूर शहरातील अनधिकृत बांधकाम, बेकायदा वृक्षतोड , अनाधिकृत हॉटेल बांधकाम या प्रश्नांवर मागील तीन दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी सुरु केलेले उपोषण आज उपोषणाचा चौथ्या दिवशी दिनांक (१३ जुलै ) रोजी पालिका प्रशासनाने या प्रश्नी पत्र दिल्यावर मागे घेण्यात आले. शहरातील या वरील विषयासंदर्भात सय्यद यांनी उपोषण चालू केले होते. काल( १२ जुलै) या प्रश्नी मुख्याधिकारी प्रसाद बोरकर यांनी सय्यद यांची भेट घेवून चर्चा केली होती .आज पालिका प्रशासनाने सय्यद यांना पत्र दिले . त्या पत्रात म्हटले आहे की स.न. ११४९ या जागेत अनुज्ञेय नसणारा हॉटेल व्यवसाय वापर थांबविणे संदर्भात ;केलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने नगरपरिषदेने सदर जागेत अनुज्ञेन नसलेला वापर थांबविण्याबाबत पत्र दिले असून व्यवसायिकाने सदरच्या जागेतील अनुज्ञेय नसलेला वापर हा थांबविण्यात आल्याचे कळविले आहे. सुभाष चौक येथील सि.स.न.३२१ मधील अनाधिकृत बांधकामा बाबत योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. त्याच बरोबर पांजरपोळ संस्थेने केलेल्या वृक्षतोड व अमरधाम भिंत तोडले बाबत संस्थेवर महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडाचे सरंक्षण व जतन (सुधारणा)अधिनियम अन्वये कार्यवाही करण्यात आलेली आहे. असे पत्र पालिका प्रशासनाचा वतीने दिल्यानंतर उपोषणकर्ते सय्यद यांनी उपोषण मागे घेतले . यावेळी पालिकेचे अधिकारी अय्युब सय्यद, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रवी लेंडे, आदित्य मैड, प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेच्या महिला आघाडीच्या नेत्या डॉ. वैशाली साखरे, माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे, सामाजिक कार्यकर्ते सावळेराम आवारी बबनराव गायकवाड व माधव सेनेचे अध्यक्ष रविंद्र सानप, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद हे मागील तीन दिवसापासून शिरूर नगर परिषदे समोर आमरण उपोषणास बसले होते आज चौथ्या दिवशी हे उपोषण मागे घेण्यात आले.