अवैध दारू विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांची कारवाई 165 देशी दारुच्या बाटल्यासह 15 हजाराचा मुद्देमाल जप्त.
हिंगोली जिल्ह्याभरातील गावागावात,गल्ली, तांड्यावर, अवैध देशी, विदेशी दारुची सर्रास विक्री होत असल्याने एकेकाळी परवानाधारक दुकानात मिळणारी देशी, विदेशी दारू आत्ता गावागावात मिळत असल्याने गावात भांडण तंटे उद्भवत आहे यासाठी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला जिल्ह्याभरात विशेष मोहीम राबवून अवैध दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सुचना दिल्याने मागील अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई केली जात आहे.आज दि 4 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने
मौजे गोरेगाव हद्दीतील चोंडी गावा जवळ धाबा चालक दिनेश अंभोरे यांनी स्वतःच्या धाब्यावर संजय श्रावण धवसे यांच्या मार्फत अवैध देशी दारू विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती मिळालेल्या माहितीवरून चोंढी येथील धाब्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अवैध दारूची विक्री करणाऱ्या तसेच दारू पिणाऱ्याषह धाबा चालक मालकांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आले आहे तर
दुसऱ्या कारवाई मध्ये सेनगाव हद्दीतील मौजे वटकळी येथे तानाजी किशन हनवते , व भारत हनवते यांच्यावर दारू विक्री व पार्सल बाबत कार्यवाही करण्यात आली आहे तर तिसरी कारवाई हिंगोली ग्रामीण ठाणे हद्दीमध्ये वैजनाथ मुखाडे राहणार संतुक पिंपरी यांच्यावर अवैध दारू विक्री बाबत कारवाई करण्यात आली आहे.
तीन ही कारवाई मध्ये 165 देशी दारूचे बॉटल सह एकूण 15,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलीसांनी जप्त केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस आमलदार गजानन पोकळे ,लिंबाजी वाव्हळे, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, हरिभाऊ गुंजकर, निरंजन नलावारर, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.स्थानिक गुन्हे शाखेकडुन अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई केली जात असली तरी हक्काचे पोलीस ठाणे हद्दीतील पोलीसांकडून अवैध दारू विक्री करणाऱ्यांना अभय का दिले जात आहे अशी चर्चा सर्व सामान्यांतुन ऐकावयास मिळत आहे.