दि.28  कन्नड -   आज इंदिरानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र चापानेर येथे आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत व विठ्ठलरुक्माईच्या वेशभूषेत गावांमध्ये दिंडी काढली. स्वतः पांडुरंगाने पालकांची भेट घेऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे आवर्जून सांगितले. गावातील नागरिकांनी सुद्धा या दिंडीचे अतिशय जोशामध्ये स्वागत केले. गावातील महिलांनी पांडुरंगाचे,रुक्माईचे, वारकऱ्यांचे गोड तोंड करून व पूजा करून स्वागत केले. गावातील महिलांनी दिंडी समोर फुगडी खेळली‌. बाल वारकऱ्यांनी गावातील सर्व प्रवेश पात्र मुलांना शाळेत पाठवण्यास पालकांमध्ये जनजागृती केली.या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक श्री ढोले सर, श्रीमती मिसाळ मॅडम, अध्यक्ष श्रीमती सविता आव्हाड तसेच अंगणवाडी सेविका, विद्यार्थ्यांचे पालक, गावातील नागरिक ,लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती.