शिरुर दिनांक( वार्ताहर ) छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यातून  विद्यार्थ्यानी  प्रेरणा घ्यावी असे आवाहन प्रा . चंद्रकांत धापटे यांनी केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूल शिरूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे शिरूर केंद्र प्रमुख डॉ. चंद्रकांत धापटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी प्रा  धापटे यांनी शाहू महाराज यांच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच विद्यार्थ्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी व शाहू महाराज यांचे असलेले जवळचे नाते समजून घेवून शाहू महाराजांच्या कार्यातून स्फूर्ती घेऊन उत्तुंग यश प्राप्त करावे असे प्रतिपादन केले. शाळेचे मुख्याध्यापक डॉ. समीर ओंकार यांनी प्रास्ताविक केले. श्री. अमोल वाघमारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.