शिरुर दिनांक ( वार्ताहर ) राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांच्या व कार्याचा अभ्यास करावा. शाहु महाराज यांनी समाजपरिवर्तनासाठी मोठे कार्य केले अश्या शब्दांत छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले . राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील बाजार समितीचा हॉल मध्ये त्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले . यावेळी शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती ॲड .प्रदीप बारवकर , माधव सेनेचे प्रदेशाध्यक्ष बापू सानप, राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष सिंकदर पटेल , यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठचे बोरा कॉलेज येथील अभ्यासकेंद्राचे केंद्र संयोजक चंद्रकांत धापटे ,बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले , मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद ,समता परिषदेचे किरण बनकर ,भाजपाचे प्रवीण मुथा ,शिरुर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक नितीन बारवकर , भाजपाचे मितेश गादिया ,जिल्हा जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर ,शिरुर नगरपरिषद शिक्षण समितीचे माजी सभापती संतोष शितोळे ,तुकाराम खोले ,मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत आंबेकर ,शिरुर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक नितीन बारवकर , प्रा. मिलिंद माने ,रवि लेंडे , अविनाश घोगरे आदी उपस्थित होते . यावेळी प्रा. धापटे म्हणाले की राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व समाज एकत्रित कसा राहील याचा विचार केला .त्याच बरोबर शिक्षण प्रसाराचे मोठे काम केले. यावेळी प्रास्ताविक रवींद्र उर्फ बापू सानप यांनी केले. त्यात त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला .सुत्रसंचालन संजय बारवकर यानी केले तर आभार प्रवीण मुथ्था यांनी मानले यावेळी ' राजर्षी शाहू : वसा आणि वारसा ' या कॉ. गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे वाटप करण्यात आले .

फोटो ओळी -

छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त शिरुर येथे अभिवादन करण्यात आले . .