शिक्रापूर ता. शिरुर येथील ऋषिकेश सतीश जाधव याने जिद्दीच्या जोरावर यश संपादित करत सिए परीक्षा उत्तीर्ण होत वयाच्या एकविसाव्या वर्षी चार्टर अकाऊंटंट बनण्याचा विक्रम केला असल्याने शिक्रापूर सह परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

                                  शिक्रापूर ता. शिरुर येथील सर्वसामान्य कुटुंबातील ऋषिकेश जाधव याचे शिक्षण वाघोली येथील जेएसपीएम विद्यालयातून सुरु झाले, ऋषिकेशचे वडील उच्चशिक्षित असून खाजगी कंपनीत नोकरीला असल्याने आपण देखील वडिलांप्रमाणे उच्चशिक्षित व्हायचे असे ऋषिकेशचे स्वप्न होते, २०१६ मध्ये दहावी उत्तीर्ण होताच त्याने मॉडर्ण विद्यालय पुणे येथे प्रवेस घेतला दरम्यान याचे वेळी त्याने आपल्याला उच्चशिक्षित बनायचे हे ध्येय उराशी बाळगले आणि महाविद्यालयीन काळातच पुढील अभ्यास सुरु ठेवला, २०१८ मध्ये बाराचीची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याने ( चार्टर अकाऊंटंट ) सिए परीक्षेची तयारी सुरु केली, दरम्यान मे २०२२ मध्ये झालेल्या सिएची परीक्षा त्याने देऊ केली, सदर परीक्षेचा निकाल जाहीर झालेला असून यामध्ये ऋषिकेश जाधवने पहिल्याच टप्प्यात यशाला गवसणी मिळाली आहे. सध्या ऋषिकेश जाधव अवघ्या एकवीस वर्षाचा असून कमी वयात हे यश संपादित करणारा अवलिया म्हणून त्याची शिक्रापूर सह शिरुर तालुक्यात ओळख निर्माण झाली आहे. तर याबाबत बोलताना आई वडिलांनी माझ्या साठी घेतलेले कष्ट त्यामुळे मला प्रेरणा मिळाली आहे, या क्षेत्रात मी नियमितता राखणार असल्याचे ऋषिकेशने सांगितले तर आमचा पाल्य वयाच्या एकविसाव्या वर्षी उच्चशिक्षित झाला असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे ऋषिकेशचे वडील सतीश जाधव व चुलते विजय जाधव यांनी सांगितले.