वढू बुद्रुक ता. शिरुर येथे एका सख्या भावाकडूनच आपल्या सख्या बहिण व भावासह भाच्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे साहेबराव धोंडीभाऊ सावंत या इसमावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
वढू बुद्रुक ता. शिरुर येथील संगीता कोबल हि महिला घरात असताना तिचा भाऊ साहेबराव सावंत तेथे आला आणि महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत या घरात राहायचे नाही असे म्हणून लागला यावेळी सदर महिलेचा मुलगा अक्षय घराबाहेर येऊन साहेबराव यांना तुम्ही शिवीगाळ का करता असे म्हणाला असता साहेबराव यांनी अक्षयला मारहाण केली दरम्यान संगीता व साहेबराव यांचाच दुसरा भाऊ बाजीराव भांडणे सोडवण्यासाठी आला असता साहेबराव याने त्याला देखील दमदाटी करत मारहाण करून तोंडाने चावा घेत जखमी केले, याबाबत संगीता कैलास कोबल वय ४५ वर्षे रा. वढू बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी साहेबराव धोंडिभाऊ सावंत रा. वढू बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष पवार हे करत आहे.