ट्रॉमा सेंटर संबंधी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार - शरीफ भाई, लुगडे महाराज

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये बऱ्याच सुविधांची कमतरता असून या रुग्णालयामध्ये ट्रामा सेंटर सुरू करण्याची मागणी संभाजी ब्रिगेड व एमआयएमच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालयाचा विस्तार जर बघितला तर परळीभागांमध्ये धर्मापुरी - परळी, गंगाखेड - परळी, सोनपेठ - परळी, शिरसाळा - परळी, अंबाजोगाई - परळी असे चार महामार्ग परळी शहराला जोडल्या गेलेले आहेत त्यामुळे अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात असून मृत्यूचे प्रमाण खूप मोठे आहे. कारण या भागामध्ये रुग्णाला योग्य ती सुविधा भेटत नसून एक तर अंबाजोगाई येथील जिल्हा रुग्णालय किंवा लातूर शिवाय रुग्णांना दुसरा पर्याय नाही.जवळपास सुविधा नसल्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्या कारणाने गंभीर रुग्णाचे मृत्यू होतात. याबाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयएम व संभाजी ब्रिगेड च्या वतीने बीड जिल्हा शल्य चिकित्सक बीड, उपसंचालक आरोग्य विभाग लातूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी करून ट्रामा सेंटर सुरू करून परळी परिसरातील गंभीर रुग्णांच्या होणाऱ्या मृत्यूला आळा बसण्यासाठी मदत होईल. त्याकरिता योग्य ते पाऊल उचलून लवकरात लवकर ट्रामा सेंटर सुरू करावे. तसेच उपजिल्हा रुग्णालयामध्ये अनेक सुविधांचा अभाव आहे त्या सुविधा देखील आरोग्य विभागाने सर्वसामान्यांना पुरवाव्यात रुग्णांची होत असलेली हेळसांड याकडे गांभीर्याने बघून रुग्णांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशीही मागणी एमआयएम व संभाजी ब्रिगेडच्या वतीने लिखित निवेदनाद्वारे केली आहे. परळी वैजनाथ येथे लवकरात लवकर ट्रॉमा सेंटर सुरू व्हावे यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदय यांची भेट घेणार असल्याचे शेख शरीफभाई व लुगडे महाराज यांनी सांगितले.  

याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा संघटक शिवश्री सेवाकराम जाधव, एमआयएमचे तालुकाध्यक्ष शेख शरीफभाई, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज, संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष नामदेव भालेराव, विद्यार्थी आघाडी तालुका सचिव विद्याधर शिरसाठ, संभाजी ब्रिगेड तालुका सचिव प्रभाकर सटाले, एमआयएमचे युवा शहराध्यक्ष अन्वर भाई शेख, युवा नेते मोहसीनभाई, फिरोज भाई ,शेख तोफिक परली युवा उप शहर अध्यक्ष,शेख इशक, सैयद जाफर, नसीर खान, सैयद आसिफ यासह एमआयएम व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.