भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सध्या देशभर साजरा होत आहे.याचे औचित्य साधून हवेली उपविभागीय अधिकारी, तहसीलदार हवेली, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती हवेली यांच्यावतीने पुणे शहरातील चार केंद्रांवर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.या स्पर्धेत 320 स्पर्धकांनी सहभाग नोंदवून देशभक्ती विषयी आपल्या मनात असलेले रंग चित्राच्या माध्यमातून कागदावरती उतरविले.भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि गौरवशाली भारत 1947 ते 2022 या विषयांवरती चित्रकला स्पर्धा संपन्न झाली.पवार पब्लिक स्कूल नांदेड सिटी, भारतीय जैन संघटना कॅम्पस वाघोली, विस्डम इंग्लिश स्कूल हडपसर आणि भावे हायस्कूल सदाशिव पेठ पुणे या चार केंद्रांवर रविवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत स्पर्धा संपन्न झाली.यातील प्रत्येक केंद्रातून तीन अशा एकूण 12 चित्रांचे प्रदर्शन स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात भरविण्यात येणार आहे.यशस्वी स्पर्धकांना ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे.
विद्यार्थी, विद्यार्थिनींनी स्पर्धेत सहभाग घेऊन या स्पर्धा यशस्वी केल्या. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडल अधिकारी प्रमोद भांड, हिंदुराव पोळ, अशोक शिंदे व्यंकटेश चिरमुल्ला, केंद्रप्रमुख सुधीर चटणे,अंकुश बडे रोहिणी धोडमिसे,किशोर भोसले, गोपाळ शिवशरण,संतोष देशमुख यांनी केंद्र समन्वयक म्हणून कामकाज पाहिले. हवेली चे उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार तृप्ती कोलते, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्पर्धा संपन्न झाल्या.