ट्रकने बसला पाठीमागून धडक देताच बस दुभाजकाला धडक २५ प्रवासी जखमी.
"बसचा दुहेरी अपघात ;आडुळ बायपासवरील घटना"
पाचोड/धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून छत्रपती संभाजीनगर कडुन एक मालवाहतूक ट्रक जात असताना त्या ट्रकला एसटी बसने आडुळ जवळील हॉटेल महाराष्ट्र समोर (दि.१९) रात्री साडे अकराच्या दरम्यान ओव्हरटेक केले असता. ट्रक चालकाने त्या बसला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने बस चालकांचे बस वरील नियंत्रण सुटल्याने ही बस दुभाजकाला धडकली. यामध्ये बसमधील जवळपास प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला असून, ज्यात एकूण 20 प्रवासी जखमी झाले असल्याचे समोर येत आहे. तर यातील 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. संभाजीनगरहून उदगीरकडे जाणारी बस ( क्रमांक एमएच 20 बीएल 3823) धुळे- सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील आडुळ शिवारातील बायपासवरून रात्री 11 वाजेच्या सुमारास जात होती. दरम्यान आडुळ शिवारात आल्यानंतर बसला आडुळ येथे थांबा असल्याचे चालकाच्या लक्षात आले नाही. मात्र आडूळ फाटा मागे राहिले असल्याचे बस चालकाच्या लक्षात आल्यावर त्याने घाईघाईने बसला अचानक महामार्गावरच ब्रेक मारला. मात्र याचवेळी बसच्या पाठीमागे असलेला भरधाव ट्रकने (क्रमांक एपी 21 टिएक्स 3636) बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. ट्रकने दिलेल्या धडकीनंतर बस दुभाजकाला जाऊन धडकली. यात बस चालक, वाहकासह जवळपास 20 प्रवासी जखमी झाले. यातील 10 जण गंभीर जखमी आहेत. अपघात होताच ट्रक चालक ट्रक सोडून तिथून पसार झाला आहे. या अपघाताची माहिती पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांना मिळताच त्यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होऊन
जखमींना आडुळ येथील नागरीकांनी मदतकार्य करुन 1033,108 रुग्णवाहिकेने उपचारासाठी संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयात हलविले. या अपघाताची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार जगन्नाथ उबाळे हे करीत आहेत.