शिक्रापुरात नराधम बापाकडूनच मुलीचा विनयभंग

( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथे बापाकडूनच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला जात असल्याची धक्कादायक घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नराधम बापावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

                        शिक्रापूर ता. शिरुर येथील अल्पवयीन युवती महाविद्यालयीन शिक्षण घेत असून मुलगी घरात झोपलेली असताना पहाटेच्या सुमारास तिची आई स्वयंपाक करत असताना तिचा बाप तिच्या शेजारी येऊन अश्लील चाळे करु लागला त्यावेळी मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला, त्यांनतर काही दिवसांनी पुन्हा नराधमाने मुलीशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला, नंतर सदर मुलगी शिक्षणासाठी गेलेली असताना तिच्या बापाने सदर महाविद्यालय संस्थेत फोन करुन मुलीच्या आईला काहीतरी झाले आहे तुम्ही तिला घरी पाठवा असे सांगितले, मात्र यावेळी सदर प्रकाराबाबत मुलीला शंका आल्याने तिने सदर खोटा असून आईशी माझे बोलणे झालेले आहे असे सांगत घडलेला प्रकार तिच्या ओळखीच्या सामाजिक कार्यकर्त्या महिलेला सांगितला, दरम्यान सदर सामाजिक कार्यकर्त्या महिलेशी चर्चा करत मुलीने शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी सदर नराधम बापाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे हे करत आहे.