शिक्रापूर पोलिसांत ॲट्रॉसिटीसह बलात्कार प्रकरणी युवकाला अटक

तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून गुजरात मध्ये पळवून नेऊन तीन महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली असून याप्रकरणी शिक्रापूर पोलीसांनी अविनाश रामदास फडतरे याचे विरुद्ध ॲट्रॉसिटी व बलात्कार प्रकरणी गुन्हे दाखल केले आहे.

                         कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील पिडीत युवती एका कंपनीत कामाला असून सदर कंपनीत कामाला असलेल्या अविनाश फडतरे याच्याशी तिची ओळख झाली, त्यांनतर अविनाश याने युवतीला लग्नाचे आमिष दाखवत प्रेमाच्या जाळ्यात ओढले, अविनाश याचे लग्न झालेले असताना देखील मी माझ्या पत्नीला घटस्फोट देणार असल्याचे सांगत युवतीला सणसवाडी येथे हॉटेल वर घेऊन जात बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला, मात्र त्यांनतर देखील अविनाश याने तीन महिन्यांपूर्वी युवतीला गुजरात येथे पळवून नेत तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला, मात्र युवती व अविनाश हे दोघे घरुन अचानक बेपत्ता झाल्याने दोघांच्या पालकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली असल्याने पोलिसांनी दोघांचा शोध घेत पोलीस स्टेशन येथे आणले असता अविनाश याने लग्नाचे आमिष दाखवत मला पळवून घेऊन जाऊन तीन महिन्यांपासून अत्याचार केल्याचे पीडित युवतीने सांगितले, तर घडलेल्या प्रकाराबाबत युवतीने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी अविनाश रामदास फडतरे (रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे) याचे विरुद्ध ॲट्रॉसिटीसह बलात्कार प्रकरणी गुन्हे दाखल करत अविनाश रामदास फडतरे याला तातडीने अटक केली असून पुढील तपास शिरुर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी व पोलीस हवालदार चंद्रकांत काळे हे करीत आहेत.