डॉ सौ इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयाची बारावी निकालाची यशस्वी परंपरा कायम

छत्रपती संभाजीनगर--

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फ नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला असून डॉ सौ इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सर्व गुणवतांचा सत्कार आज महाविद्यालयातील मल्टीपर्पज हाॅल मध्ये प्राचार्य डॉ सुनिता बाजपाई, पर्यवेक्षक डॉ प्रभाकर गायकवाड, प्रा मंगल मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

विज्ञान शाखेचा 92.59 टक्के, कला शाखा 72.58, वाणिज्य 77.19,एच एस व्ही सी 83.33 याप्रमाणे निकाल लागला आहे. कला शाखेतुन सर्वप्रथम गार्गी पदे,द्वितीय प्रतीक्षा लिम्बारे ,तृतीय संज्ञा खळीकर

विज्ञान शाखेतुन सर्वप्रथम भंडारे अंकिता, द्वितीय-भालेराव यश, तृतीय पुजा बनसोडे, वाणिज्य शाखेतून सर्व प्रथम आर्या खुंटे, द्वितीय - अब्दुल अन्सारी अर्हम मोहम्मद, तृतीय स्वयंभू सिंघवी तर एच एस व्हि सी शाखेतुन प्रांजल शर्मा, द्वितीय - अनन्या बोर्ड, तृतीय -दिव्या वाघमारे तसेच अनेक विद्यार्थी 90 टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. साक्षी जैस्वाल, सृष्टि घुम्बरे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केले. पालकांमधून शरद बनसोडे मनोगत व्यक्त केले तर शिक्षकांमधून प्रा मंगल मोरे , प्रा माधूरी भावसार. प्राचार्य डॉ सुनिता बाजपाई यांनी अध्यक्षीय समारोप केला.मराठवाडा लिगल ऍण्ड जनरल एज्युकेशन सोसायटी च्या सचिव ऍड. डॉ.कल्पलता पाटिल भारस्ववाडकर, अध्यक्ष ऍड.जे. के. वासडीकर , ओ एस अर्चना कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर गायकवाड, सूत्रसंचालन प्रा. प्राची कापसे तर आभार प्रदर्शन डॉ शोभा हनवते यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.