केज तालुक्यातील पदाधिकार्‍यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश ; सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली काम करणार-पंजाबराजे देशमुख

प्रतिनिधी। बीड तालुक्यातील शिवसेनेसह इतर पदाधिकार्‍यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली बीड येथील कार्यालयात रविवारी (दि.7) जाहीर प्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे युवा नेते पंजाबराजे देशमुख यांनी म्हटले आहे.

यावेळी श्री.देशमुख यांच्यासह युसूफवडगावचे उप तालुकाप्रमुख चंद्रकांत इंगळे, आडसचे उप तालुकाप्रमुख विकास काशीद, तालुका सचिव डॉ.संतोष बुडूख, पंचायत समितीचे माजी सदस्य विलास चोपणे, येवत्याचे युवासेना अध्यक्ष रमेश चिंचकर, उप तालुकाप्रमुख सुग्रीव सक्राते, माजी शहर प्रमुख बालासाहेब पवार, अशोक जोगदंड, ज्ञानेश्वर घाटूळ, युवासेना अध्यक्ष रमेश चिंचकर आदींनी शिवसेनेच्या शिंदे गटात जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला आहे.