थेरगावमध्ये जुगार अड्यावर धाड;सात जुगारी अटकेत..
"दोन लाख तेहतीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त;पाचोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई"
पाचोड(विजय चिडे) पैठण तालुक्यातील थेरगाव येथील गोविंद मंगल कार्यालया समोर
जुगार खेळणाऱ्या सात जणांना पाचोड पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले असून ही कारवाई रविवारी (दि.१४) रात्री आडीच वाजेच्या सुमारास घडली असुन या कारवाई मध्ये दोन लाख तेहतीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन पाचोड पोलिसांनी जुगाऱ्यांना अटक केली.
याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, थेरगाव येथील गावात काही जुगारी पाचोड-पैठण राज्यमार्गावरील गोविंद मंगल कार्यालया समोर झन्ना मन्ना नावाचा जुगार पैशावर खेळा जात असल्याची माहिती गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली असता पाचोड पोलिसांना असता तात्काळ त्या मोकळ्या जागेवर गेले असता तिथे काही लोक जुगार पैशावर खेळत होते. त्याचवेळी पोलीस पथकाने छापा टाकला.यामध्ये 1) नितीन भानुदास वाघ ,2) कृष्णा रामभाऊ गुंजाळ, 3) बाबासाहेब हरिचंद्र वाहुळे, 4) दिलावर सुलेमान शेख, 5) अंकुश विनायक मोरे ,6) साजिद मुबारक शेख ,7) शेरू रशीद पठाण सर्व रा. थेरगाव ता. पैठण जि.छत्रपती संभाजीनगर यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून जुगाराचे साहीत्य, रोख रक्कम व इतर सात दुचाकी असा एकुण दोन लाख तेहतीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष माने , कर्मचारी संदीप पाटेकर, विलास काकडे, बाबुराव साबळे, बालूदे यांनी केली असून झन्ना मन्ना खेळणाऱ्या सात ही जणांवर पाचोड पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सपोनि संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार किशोर शिंदे हे पोलिस करीत आहे.