शिरूर पोलिसांकडून  गांजा व चरस विक्री करणाऱ्या आरोपींना अटक केली असून १लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वडगाव रासाई येथे नुकतीच कारवाई करून गांजा विक्री प्रकरणी महिलेस अटक केली होती.या महिलेकडे पोलिसांनी अधिक तपास केला असता,दौंड तालुक्यातील हातवळण येथून सदर माल खरेदी केला असल्याचे सांगितले.यानंतर शिरूर पोलिसांनी हातवळण येथे जाऊन बाळासाहेब सर्जेराव गवळी यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता,३०० ग्रॅम वजनाचा चरस व ६०० ग्रॅम गांजा असा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चरापले,सहायक फौजदार रमेश कदम,पोलिस हवालदार नितीन सुद्रिक,पोलिस नाईक नाथसाहेब जगताप,विनोद मोरे, रधूनाथ हळनोर,सचिन भोई यांनी केली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले हे करत आहेत.