फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा आणि लोकसेवा इंग्लिश मिडीयम स्कूल येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी मैत्री दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला.५० विद्यार्थ्यांच्या गटाने लोणीकंद पोलिस स्टेशन येथे भेट देऊन पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.त्यासोबतच सर्वांना मैत्रीचा धागा बांधला.नेहमीच्या धकाधकीच्या दैनंदिनी तून पोलिस अधिकारी यांनी विद्यार्थ्यांसोबत हितगुज केले.पोलिस स्टेशन येथील कार्य,महिला सुरक्षा ,माहिती तंत्रज्ञान या विषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सर्व माहिती उत्साहाने समजून घेतली.

 यावेळी लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलिस निरीक्षक पाटील ,पोलिस उपनिरीक्षक प्रियांका पवार,पोलिस कॉन्स्टेबल रोहित काळे,पोलिस कॉन्स्टेबल सरडे,पोलिस कॉन्स्टेबल पीलाने यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.प्राचार्य डेनसिंग,लक्ष्मी कुलकर्णी,अर्जुन शिंदे,सुरेश पाटील, संकिता कुरले आदी उपस्थित होते.