सोशल मीडियातून झालेल्या ओळखीनंतर आलेल्या शारीरिक संबंधांचा व्हिडीओ व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी तुळजाभवानीनगर, खराडी येथील तरुणीवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाघोली येथील तरुणाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

      याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली येथील लोहगाव रोडवरील एका सोसायटीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या एका तरुणाची सोशलमिडीयावर ओळख झाली होती. ओळखीनंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले होते. तरुणीने संबंधांचा नकळत व्हिडीओ तयार करून तरुणाला ब्लॅकमेल करून पैसेही उकळले. तरुणाकडून पैसे देणे बंद झाल्याने तरुणीने स्वतःचा भाग एडीट करून तरुणाचाच शारीरिक संबंधांचा भाग दिसेल असा व्हिडीओ तयार करून तरुणाच्या नातेवाईकांना पाठवून सोशल मिडीयावर व्हायरल केला. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.