हर घर तिरंगा रँली थेट शिक्षकांना काढवावे लागली चिखलातून...

पैठण तालुक्यातिल दावरवाडी येथील प्रकार"

पाचोड;परिसरात गेल्या काही दिवसापासून पाऊस पडत असल्यामुळे गावातील रस्त्यावरील खड्डेत पावसाच्या पाण्यामुळे पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे जागोजागी खड्डे तयार होऊन त्यात चिखल तयार झाला देश स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवाची देशभरात गाजावाजा करत हर घर तिरंगा उपक्रम सुरु असल्याने येथे शाळेतील विद्यार्थ्यांने रँली काढण्यात आली होती. मात्र देशाच्या अमृत महोत्सवाची रॅली अर्ध्या गावातूनच संपवण्याची वेळ येथील शाळेतील शिक्षकांवर आली आहे.

एकीकडे देश स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवाची देशभरात गाजावाजा करत हर घर तिरंगा सह अनेक उपक्रम राबवून साजरा करत आहे. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष होऊन ही अमृत महोत्सवाच्या मिरवणूक रॅली काढण्यात येत असून या रॅल्याना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. दावरवाडी येथील अंतर्गत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावर पाणी साचले आहे. यामुळे याचा त्रास नागरिक, ग्रामस्थांना होत आहे. शनिवार दि 6 ऑगस्ट रोजी न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय दावरवाडी येथील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ढोल ताशाच्या गजरात गावभरातून रॅली काढण्यात आली. 

यावेळी या विद्यार्थ्यांना रॅली काढत असताना गावांतर्गत रस्त्यावरून कधी चिखलातून तर कधी कधी रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या मोठमोठ्या डोपकडातून रस्ता काढून ही रॅली पूर्णत्वाकडे नेण्याची वेळ आल्याचे पाहायला मिळाले आहे, गावातील अनेक भागांमध्ये या विद्यार्थ्यांना आपली रॅली न नेताच अर्ध्यातूनच परतवण्याची वेळ ही आली आहे. विशेष म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र कष्ट करून भारतीय संविधान निर्माण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गावातील असलेल्या भागतील पुतळ्यापासूनच रस्त्यावरीलपाणी आणि खड्ड्यामुळे या रॅलीला मागे फिरावे लागले आहे. यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. मात्र काही चुकीच्या धोरणामुळे गाव विकासाला मोठीखीळ बसल्याचे चित्रही या निमित्ताने डोळे वटारून समोर येत आहे. हे एक गाव विकासाच्या बाबतीत चिंतन करत याचा विषय ठरत असल्याचं नागरिकांकडून बोललं जात आहे. 

 या गाव अंतर्गत रस्त्यामुळे ही देशाच भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजच अशा रस्त्यातून कसरत करून शाळेत जावं लागत आहे तर ज्या भागामधून अमृत महोत्सवाची रॅली अर्ध्यातून परतावा लागली गावातील त्या भागातील ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्यानंतर पुणे येथे राहण्यासाठी गेला आहे तर या भागातील विकास करायचं कोणी नागरिकांच्या समस्या सोडायचा कोणी असाही प्रश्न यावेळी उपस्थित राहिला आहे. तर आता या अमृत महोत्सवी राजकीय पुढार्‍यांना आणि सता भोगणाऱ्यांना गावाचा विकास करण्याची बुद्धी या अमृत महोत्सवानिमित्त यावं अशीच अपेक्षा ग्रामस्थ करत आहेत.