ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीतून भारताला मुक्त करण्यासाठी हजारो देशभक्तांनी प्राणपणाने प्रयत्न केले. सशस्त्र क्रांतीच्या मार्गापासून तर अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करून, क्रांतिकारकांनी देश स्वतंत्र केला. क्रांतिवीर व अनेक अनामिक यांच्या समर्पित त्यागामुळेच आज भारत स्वतंत्र आहे. या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. याचे औचीत्य साधून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभरात विविध कार्यक्रमाद्वारे अमृतमोहोत्सवी वर्ष उत्साहाने साजरे होत आहे. दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण देशभरात हर घर तिरंगा अभियान राबवले जाणार आहे. हा राष्ट्रउत्सव साजरा करण्यासाठी बीड जिल्ह्यातील समस्त सुजाण नागरिकांनी सहभागी व्हावे. प्रत्येकाने आपल्या आस्थापना, प्रतिष्ठान, व घरावरती तिरंगा झेंडा लावावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.
हर घर तिरंगा अभियानाचा संदेश सामान्य माणसा पर्यंत जावा. लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी 13 ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी 9.00 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या पुतळ्याला अभिवादन करून, भव्य तिरंगा रॅली बीड शहरातून काढण्यात येणार आहे. या तिरंगा रॅलीमध्ये निवृत्त लष्करी अधिकारी, जवान, स्वातंत्र्य सैनिक, सर्व धर्मीय गुरुजन, बीड स्काऊट पथक, शिक्षक, प्राध्यापक विद्यार्थी, युवक, महिला व्यापारी आदि सर्व स्तरातील नागरिकांच्या सहभागातून हि रॅली संपन्न होणार आहे. अशी माहिती राजेंद्र मस्के यांनी दिली आहे. या रॅलीचे नियोजणासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्र मस्के, ॲड सर्जेराव तांदळे, नवनाथ शिराळे, सलीम जहांगीर, प्रा. देविदास नागरगोजे, विक्रांत हजारी, चंद्रकांत फड, अशोक लोढा, भगीरथ बियाणी, डॉ. लक्ष्मण जाधव, अजय सवाई, डॉ. जयश्रीताई मुंडे, संग्राम बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत संघर्षयोद्धा भाजपा कार्यालय येथे बैठक संपन्न झाली.
या बैठकीस अनिल चांदणे, शांतीनाथ डोरले, संदीप उबाळे, प्रमोद रामदासी, संतोष राख, प्रा. सचिन उबाळे, नागेश पवार, विलास बामणे, शरद झोडगे, भूषण पवार, विशाल पाखरे, सुरवसे महाराज, बाबूलाल ढोरमारे,संभाजी सुर्वे, लताताई बुंदेले, मीराताईगांधले, छायाताई मिसाळ, संध्याताई राजपूत, शीतलताई राजपूत, लताताई राऊत, प्रितताई कुकडेजा, नरेश पवार, राजेश चरखा, अम्मू जहागीरदार, महेश भिशे, राम राऊत, कल्याण पवार, अजय ढाकणे, ऋषिकेश फुंदे, अशोक पांढरे, पंकज धांडे, आदि पदाधिकारी उपस्थित होते.