आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या चौघाजणांवर पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..

पाचोड; पैठण तालुक्यातील पाचोड येथून एका व्यक्तीने १३ जुन रोजी गावालगत असणाऱ्या विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मिठठु नारायण साबळकर (वय 52)असे त्या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव होते. मात्र त्यांनी आत्महत्या याचे कारण समजू शकले नव्हते मात्र या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.

याविषयी पोलिसांकडून सविस्तर भेटलेली माहीती अशी की,पाचोड येथील मिठ्ठु नारायण साबळकर वय 52 वर्ष रा.पाचोड ता.पैठण यास गावातील चंदा नितीन उर्फ दादा डुकळे , शिलाबाई गोपाळ डुकळे ,नितीन उर्फ दादा गोपाल डुकळे , योगेश गोपाल डुकळे सर्व रा . पाचोड ता.पैठण या चौघांनी संगणमत करुन साबलकर यांना काठीने व चापट - बुक्याने मारहान करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती व महीलांनी मारल्यामुळे साबलकर याची समाजात खुप अपमान झाला होता ते सहन झाले नाही त्यामुळे (दि.13)जून 2022 रोजी संध्याकाळी विहीरीत उडी मारुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले होते.त्यामुळे या चौघां जणांना विरुद्ध मयताच्या पत्नीने तक्रार दिली असल्याने पाचोड पोलीस ठाण्यात कलम 306,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुरेश माळी हे करीत आहेत.