गोरेगाव येथील तलाबकट्टा मस्जीत मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राजेश भैय्या पाटील यांनी दिल्या शुभेच्छा.

मुस्लिम बांधवाचा सर्वात महत्वाचा मानला जाणारा पवित्र रमजान महिना सुरू असून मुस्लिम समाजात रमजान या महिन्याला फार महत्व असुन रमजान महिन्यात सर्व मुस्लिम बांधव, महिला तसेच लहान लहान मुलं दिवसभर रोजा उपवास ठेवून कुराण पठण करुन अल्लाह ची इबादत करत अल्लाहला राजी करुन धरतीवरील सर्व समाजातील नागरीकांना सुख, शांती, समाधान आणि समृद्धी प्रदान करण्यासाठी विशेष दुआ केली जाते.रमजान महिन्यानिम्मीत गोरेगाव येथील तलाबकट्टा मस्जीत मध्ये दि 9 एप्रिल रविवार रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राजेश भैय्या पाटील गोरेगावकर ,माजी सरपंच भास्करराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे, पिडीसी बॅकेचे कर्मचारी सुधाकर कावरखे, प्रल्हाद राव,माजी ग्रामपंचायत सदस्य सयद जलील,शेख गफ्फार भाई आतार,सयद मोहिदीन, सय्यद अकबर,सयद बुढन भाई,शेख सालार,सयद आनिस,सयद इरफान,सयद कदीर,शेख इम्रान,शेख मोईन,आमेर शेख,अनसर भाई कुरैशी,सयद सलीम सदर,शेख अहेमद,शेख महंमद, दुकानदार ऐजास शेख,सयद गुलाब,उमर शेख,शेख अकबर,सयद मुस्तफा,आदी उपस्थित होते यावेळी मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राजेश भैय्या पाटील यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान निमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी मुस्लिम बांधवांनी आपसातील बंधुभाव एकात्मता टिकुन राहण्यासाठी प्राथना करणार असे सांगितले.