कडेठाण येथे भारत राष्ट्रसमिती पक्षाची बैठक
पैठण तालुक्यातील कडेठाण बुद्रुक येथे मारुतीच्या मंदिरात भारत राष्ट्र समितीची बैठक झाली या प्रसंगी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष यांनी नुकताच भारत राष्ट्र समितीमध्ये पक्षात प्रवेश केलेले कैलास तवार यांनी नुकताच तेलंगाना राज्याचा दौरा करून येथील मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेऊन भेटीतील वृत्तांत शेतकऱ्यांच्या बैठकीत सांगितला. बी आर एस सरकारने शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेती क्षेत्रात अमृलाग्र असा बदल केला शेतकरी संघटनेला अपेक्षित असलेल्या मार्शल प्लॅन खऱ्या अर्थाने तेलंगणा सरकारने राबविला शेतीला मोफत वीज व पाणी उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना दरवर्षी प्रती एकरी दहा हजार रुपये वर्षाला अनुदान सरकार देते त्याचबरोबर गावागावात खरेदी केंद्र उभारून दूध भाजीपाला व धान्यासहित सर्व शेतीमाल हमीभावाने घेण्याची व्यवस्था केली आहे त्याचबरोबर शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये त्यांच्या कुटुंबाला मदत केली जाते. प्रशासकीय व्यवस्थेतील महसुलाचा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी तलाठी हे पदच बंद केले आहे सरकारने खर्चाची क्रम बदलून शेती क्षेत्राला प्राधान्य दिले आहे त्याचा परिणाम शेतीचे उत्पन्न वाढले आहे पर्यायाने राज्याचे उत्पन्न वाढले शेतकरी सुखी तर जग सुखी ही संकल्पना खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात अमलात आणली तेलंगणात हे होऊ शकते तर महाराष्ट्रात का नाही होऊ शकत यासाठी आता जिल्हाभर प्रचार करून शेतकऱ्यांत जनजागृती करण्याचे काम आता सर्व शेतकऱ्यांनी आपल्या हितासाठी करावे आसे आव्हान कैलास तवार यांनी केले आहे या बैठकीला उपस्थित शेतकऱ्यांनी भारत राष्ट्र समितीत पक्षात काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे या प्रसंगी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते