पळशी फाटा येथे अवैध देशी दारुची विक्री करणाऱ्यावर कारवाई,
31हजाराचा मुद्देमाल जप्त.
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील पळशी फाटा येथे अवैध देशी दारुची विक्री केली जात असल्याची माहिती गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवि हुंडेकर यांना मिळाली होती पोलीसांनी पळशी फाटा येथे छापा टाकून अवैध देशी दारुची विक्री करणाऱ्या एका आरोपींवर कारवाई करण्यात आली असून त्याच्याकडून देशी दारुचे तिन बाॅक्स किमंत 11हजार 520 रुपये आणि एक दुचाकी MH26 F 6990 असा एकूण 31 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे याप्रकरणी पोलीस अंमलदार विठ्ठल नवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सिद्धार्थ जयराम इंगोले रा खुशाल नगर हिंगोली यांवर गोरेगाव पोलीस ठाण्यात अवैधरित्या देशी दारुची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवि हुंडेकर, विठ्ठल नवले, यांच्या पथकाने केली आहे.पुढील तपास मैदकर करीत आहे.