शिक्रापूरच्या आरोपीचे शिरुर मधून बेडीसह पलायन
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
शिक्रापूर पोलिसांच्या गुन्ह्यातील आरोपीला नेले होते शिरुरला
( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये महिलेचे अश्लील चित्रीकरण करत विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाल्याने पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला आज न्यायालयात हजर करायचे असल्याचे त्याला शिरुर पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यासाठी घेऊन गेलेले असताना पोलिसाच्या हाताला हिसका देऊन बेडीसह आरोपी पळून गेला असून धनराज मधुकर डोंगरे असे पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेल्या आरोपीचे नाव असून घडलेल्या घटनेने शिरुर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील एका महिलेची ओळख झाल्यानंतर धनराज याने महिलेच्या घरी जात महिलेचे अश्लील चित्रीकरण करत महिलेला त्याच्या सोबत राहण्यासाठी दमदाटी करत होता, त्याबाबत महिलेने २४ मार्च रोजी शिक्रापूर पोलिसांत तक्रार दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी सदर गुन्ह्यातील आरोपी धनराज डोंगरे याला तातडीने अटक केली होती, मात्र सदर आरोपीला आज शिरुर न्यायालयात हजर करण्यात येणार होते, रात्रीच्या सुमारास शिरुर तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशनचे आरोपी शिरुर येथील पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवले जात असल्याने २४ मार्च रोजी रात्री उशिरा शिक्रापूर पोलिसांनी अटक असलेल्या धनराज डोंगरे याला शिरुर पोलीस स्टेशन च्या कोठडीत ठेवण्यासाठी नेले, शिरुर पोलीस स्टेशनच्या आवारात पोलिसांनी गाडी थांबवून धनराज याला गाडीतून खाली उतरवले मात्र यावेळी पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला झटका मारून धनराज डोंगरे हा हातातील बेडीसह पळून गेला असल्याची घटना घडली, त्यानंतर पुन्हा शिरुर पोलीस स्टेशन येथे धनराज मधुकर डोंगरे वय ३० वर्षे रा. चारदरी ता. धारूर जि. बीड याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून शिरुर पोलिसांसह शिक्रापूर पोलिसांचे पथक या आरोपीचा शोध घेत आहे.