पैठणमध्ये शिंदे गटाकडून शिवसेनेचे मुखपञ असलेल्या 'दै. सामना'ची होळी
पाचोड (विजय चिडे)छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमध्ये शिवसेना युवासेनेच्या वतीने सामना पेपर जाळून व सामना पेपरला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.सामन्यामध्ये वारंवार खोट्या बातम्या छापणे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची बदनामी करणे याचा निषेधार्थ संतप्त शिवसैनिकांनी सामना पेपर जळून निषेध व्यक्त केला.यावेळी तालुकाप्रमुख अण्णासाहेब लबडे, दादा पाटील बारे ,किशोर चौधरी युवा सेना जिल्हाप्रमुख काकासाहेब टेके संतोष सव्वाशे बबन बोबडे दिपक मोरे अशोक फासाटे राजू मापारी आबासाहेब गिरगे मनिष औटे पोपट ढाकने संजय कसतुरे सुनिल हिंगे जनार्दन मिटकर बाळासाहेब पठाडे राजु खरात राहुल काळे अशोक शिंदे सोपान बागंर योगेश खोलासे कैलास बोबडे रेवन लोनकर विक्रम गिरगे प्रदिप नरके आदि शिवसैनिक उपस्थित होते.