छत्रपती संभाजीनगरमधील सुंदरवाडी येथील एका कोरोनाबाधित वृद्ध महिला रुग्णाचा मृत्यू

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

पाचोड// 

 कोरोनाने पुन्हा पाय पसरायला सुरूवात केली आहे, शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. शुक्रवारी (दि.24) छत्रपती संभाजीनगरातील सुंदरवाडी येथील 65 वर्षीय वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी दिली आहे.सुंदरवाडी येथील ही महिला गेल्या महिन्याभरापासून सर्दी, ताप, खोकला आदी आजाराने त्रस्त होती. तिला श्वास घेण्यास अडचण तसेच खोकल्यात बेडकं पडणे आणि महिन्याभरापासून तिचा ताप काही कमी होत नव्हता. यावर उपचार घेण्यासाठी तिच्या कुटुंबाने तिला घाटी रुग्णालयात दाखल केले होते. लक्षणे पाहून, 17 मार्चरोजी तिच्या लाळेचे नमुने घेऊन तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. तिची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने तिच्यावर कोरोना वॉर्डात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी तिचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. गोपाळ कुडलीकर यांनी दिली.