बाजार समित्यांना विद्युत बिलाची आकारणी निवासी पध्दतीने करावी-संतोष सोमवंशी
औसा प्रतिनिधी- राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या या स्वतंत्र अधिनियमाखाली स्थापन झालेल्या प्राधिकारी संस्था आहेत. अहोरात्र काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी बाजार समित्या प्रयत्न करित असतात. शेतकऱ्यांची सेवा हीच बाजार समितीचे प्रमुख धोरण आहे. अशा वेळी बाजार समित्या या व्यावसायीक पध्दीने काम करित नसून केवळ शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे काम करित आहे. रात्री अपरात्री शेतकऱ्यांचा माल बाजार आवारात आला असता दिवाबत्ती, पिण्याचे पाणी, शेतकरी निवासात करण्यात आलेली लाईट ची व्यवस्था इत्यादी अनेक बाबतीत लाईटची व्यवस्था बाजार समित्यांना करावी लागते. मात्र अशा प्रकारे काम करित असतांना विद्युत मंडळाकडून बाजार समित्यांना व्यवसायिक पध्दतीने आकारणी केली जाते व लाखो रुपयांचे बिले विद्युत मंडळाकडे भरणा करावी लागतात. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात लाईटची बिले भरणा करू शकत नाही परिणामी बाजार समित्यांचा विद्युत पुरवठा खंडीत केला जातो व शेतकऱ्यांचे हाल होतात. वास्तविक पाहता बाजार समिती व्यापारी संस्था नसून सेवाभावी संस्था आहे. त्यामुळे व्यावसायिक प्रमाणे विजेचे दर बाजार समितीला परवडणारे नाहीत तरी विजेच्या बिलाची आकारणी करताना कमीत कमी रू. 1 ते 2 प्रतिवीज आकार आकारावा. इतर आकार अधिभार वीजशुल्क व इतर आकार आकारू नयेत.
राज्यातील बाजार समित्यांना कमर्शियल दराने लाईट बिलाची आकारणी न करता निवासी पध्दतीने आकारणी करण्यात यावी जेणेकरून बाजार समित्यांना आर्थिक संकटातून सुटका होवू शकेल अशी मागणी महाराष्ट्र बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांनी मा. मुख्यमंत्री यांना केली आहे.