पिंपळे जगताप मध्ये अल्पवयीन युवती अत्याचाराने गरोदर

( शिक्रापूर प्रतिनिधी ) पिंपळे जगताप ता. शिरुर नजीक भारत गॅस फाटा येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन युवतीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार केल्याने अल्पवयीन युवती गरोदर राहिल्याने घटनेला वाचा फुटल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संकेत बबन कुसाळकर या युवकावर बलात्कार सह बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आले.

                               पिंपळे जगताप ता. शिरुर नजीक भारत गॅस फाटा येथे राहणाऱ्या अल्पवयीन युवतीची ओळख संकेत कुसाळकर याच्या सोबत झाली त्यांनतर संकेत याने युवतीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला, सदर घडलेल्या प्रकाराने अल्पवयीन युवती गरोदर राहिली, मात्र संकेत हा तिच्याशी लग्न करण्यास टाळाटाळ करु लागला दरम्यान घडलेल्या प्रकाराबाबत युवतीने तिच्या आईला सर्व माहिती दिल्याने युवतीच्या आईने युवतीसह शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठत घडलेल्या प्रकाराबाबत फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी संकेत बबन कुसाळकर वय २१ वर्षे रा. पिंपळे जगताप ता. शिरुर जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला तातडीने अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे व पोलीस शिपाई अविनाश पठारे हे करत आहे.