हरभरा विक्रीसाठी नोंदणी करावी - सभापती संतोष सोमवंशी

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

 औसा प्रतिनिधी- औसा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघातर्फे नाफेड अंतर्गत हरभरा खरेदी करण्यात येणार असून ही खरेदी करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियाद्वारे नोंदणी चालू झालेली आहे, तरी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा औसा खरेदी-विक्री संघाचे सभापती संतोष सोमवंशी यांनी केले आहे. 

  औसा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ शेतकऱ्याच्या हितासाठी काम करणारे असून या संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आहे. या संघाच्या माध्यमातून नाफेड अंतर्गत शेतीमाल खरेदी प्रक्रिया वेळोवेळी राबविण्यात येते. सध्या हरभरा खरेदीची प्रक्रिया चालू झालेली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.या नोंदणी नंतर क्रमानुसार शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी संघामार्फत केली जाते. नोंदणीसाठी ऑनलाईन पीक पेरा असलेला सातबारा, 8अ, बँक पासबुक, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे, तरी शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत हरभरा विक्रीसाठी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात नोंदणी करून आपला माल संघाकडे विक्रीसाठी आणावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा औसा खरेदी विक्री संघाचे सभापती संतोष संतोष सोमवंशी यांनी केले आहे.