जिंतूर तालुक्यातील वस्सा येथील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेण्याकरीता वस्सा येथून जिंतूरला दररोज येजा करावी लागते. मात्र वस्सा जाणारी महामंडळची बस बंद असल्याने,विद्यार्थ्यांना नाईलाजाने जीव धोक्यात घालून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतोय. त्यामुळे वस्सा, आसेगाव, दुधगाव,परभणी मुक्कामी बस सुरू करावी अशी मागणी,वास्सा व परिसरातील विद्यार्थ्यांनी जिंतूर आगार व्यवस्थापक यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते इरशाद पाशा चाँद पाशा,सतीष देशमुख व परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.