लातूर : बाहेर गावच्या महिलांना लातूर शहरातील आपल्या घरात स्वतःच्या घरात ठेवून त्यांना पैशाचे आमिष दाखवत त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय घेणाऱ्या एका महिलेवर AHTU पथकाने कारवाई करत अटक केली.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, 23 रोजी पोलीस पथकाला माहिती मिळाली की, लातूर शहर परिसरातील एक महिला घरात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरून स्त्रियांना बोलावून घेऊन त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक सोमय मुंडे , अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे, लातूर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनात एमआयडीसी चे गोरख दिवे, स.पो.नि. संदीप कामत, पोउपनि. श्यामल देशमुख, सुभाष सुर्यवंशी यांच्यासह पथकातील अधिकारी व महिला अमलदार यांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून सदर ठिकाणी छापा मारण्यात आला. सदर ठिकाणी एक व एक पिडीत महिला अशा दोन महिला आढळून आल्या. त्यांच्याकडून मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 6,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेस अटक करण्यात आली आहे.