तांबे एज्युकेशन सोसायटी दहिसर मुंबई संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यानिकेतन पिंपरखेडा ( ग) शाळेत वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष *प्रि. आर.एल.तांबे साहेब* यांचे लेझीम पथक व ढोल ताशाच्या गजरामध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या पुष्पवृष्टीने भव्य स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी *संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तांबे साहेब* होते. तसेच कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी - *आर .डी. मोरे साहेब* ( परतुर पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी ). *श्री कांबळे सर* ( प्रशासकीय अधिकारी) *श्री. विजयकुमार खरात सर* ( मुख्याध्यापक ) *श्री.बाळासाहेब अंभिरे* ( प्रदेश सरचिटणीस काँग्रेस तथा वाटूर ग्रा. प. स. ) *डॉ. गजानन केशरखाणे* ( वाटुर ग्रा. सरपंच ) *श्री. लक्ष्मणराव शिंदे* ( युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष परतुर तथा ग्रा.प. स. वाटुर;) *श्री. नरसिंग मामा राठोड (* सरपंच कानफोडी) *श्री. खंदारे साहेब* ( महाराष्ट्र पोलीस ) *अझर भाई शेख* ( माजी उपसरपंच वाटुर तथा लोकमत चे पत्रकार ) संजय चव्हाण सर ( क्रिएटिव्ह हायटेक कम्प्युटर इन्स्टिट्यूट ) श्री.राम जाधव सर.( क्रिएटिव्ह कोचिंग क्लासेस ) कैलास मुळे, कैलास माने, आसाराम चव्हाळ, भरत राजबिंडे, रामेश्वर दादा कैलास माने, आदी मान्यवर व पालक उपस्थित होते. स्त्री शिक्षणाच्या जनक *सावित्रीबाई फुले* , स्वराज्याचे संस्थापक *छत्रपती शिवाजी महाराज,* भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार *डॉ.बाबासाहेब आंबेडकर* या महामानवांच्या *प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन* करून कार्यक्रमास सुरुवात झाली. तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळवलेल्या *विद्यार्थी* व शाळेचे क्रीडा शिक्षक *श्री. शिरसाट सर* यांनी मिळवलेले बक्षिसांचं वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक *श्री. विजयकुमार खरात सर* यांनी केले.वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मंचावर उपस्थित सर्व प्रमुख अतिथींचे मनोगत झाले.व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष *प्रि.आर एल तांबे साहेब* यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप केला. व राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - श्री. अनिल काळे सर यांनी तर आभार प्रदर्शन - श्री. गजानन साळवे सर यांनी केले.