शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मतदारसंघातील शिवसैनिकांचे खच्चीकरण केले. आता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्याने खेड तालुक्यातील संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर त्याचे दहन केले. तसेच गद्दार आढळराव असा फलक हातात घेत शिवसैनिकांनी त्यांचा तीव्र निषेध निषेध केला.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेला जमहाराष्ट्र करीत मुख्यमंत्री व शिवसेनेची बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने खेड तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. खेड तालुक्यातील शिवसैनिकांचा उद्रेक मंगळवारी (दि. 19) झाला अन् राजगुरूनगर येथे आढळराव पाटील यांचे गाढवावर फोटो छापून गद्दार शब्द लिहून या प्रतिमेचे शिवसैनिकांनी दहन केले.
या आंदोलनात माजी जिल्हा प्रमुख राम गावडे, जिल्हा समनव्यक ऍड. गणेश सांडभोर, माजी तालुका प्रमुख सुरेश चव्हाण, अमोल विरकर, तुषार सांडभोर, कुमार ताजवे, निलेश वाघमारे, चंद्रकांत भोर, महेंद्र घोलप, बबनराव दौंडकर, सचिन पडवळ, बाजीराव बुचुडे आदी शिवसैनिक सभागी झाले होते. ऍड. गणेश सांडभोर यांच्या नियोजन खाली हे आंदोलन करण्यात आले.