पुणे जिल्ह्यातील सणसवाडी ता. शिरुर येथील एका कंपनीमध्ये ठेकेदाराला दमदाटी करत काम बंद करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे समीर हरगुडे या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

                               सणसवाडी ता. शिरुर येथील फुजीफिल्म सेरीकॉल इंडिया प्रायवेट लिमिटेड कंपनीमध्ये राकेश मराठे यांचा ठेका आहे, मराठे यांचे कंपनीमध्ये काम सुरु असताना समीर हरगुडे हा तेथे आला त्याने तुमची कामे बंद करा, तुम्ही येथे काम करायचे नाही, तुमचे सगळे साहित्य घेऊन जा, तुम्हाला येथे काम करायचे असेल तर मला पंधरा हजार रुपये द्यावे लागेल असे म्हणून धमकी दिली, त्यांनतर पुन्हा समीर याने सायंकाळच्या सुमारास राकेश मराठे यांना फोनवर धमकी दिली, याबाबत रमेश पुंजाराम कोंजरे वय ६३ वर्षे रा. राजीवनगर लेन नंबर ३ विमानगर पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी समीर हरगुडे ( पूर्ण नाव माहित नाही ) रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करत आहे.