रविवारी होणार "आयआयबी महाफास्ट" परीक्षा

 औसा: आयआयबी करियर इन्स्टिट्युट अकोला आणि औरंगाबाद शाखेत इयत्ता ११ वीतून १२ वी जाणाऱ्या आणि नीट, जेईई अर्थात मेडिकल, इंजिनिअरिंगच्या पूर्व परीक्षेच्या तयारी करण्याचा चंग बांधलेल्या विद्यार्थ्यांच्या सुविधेकरिता आयआयबी करियर इन्स्टिट्यूटच्या वतीने रविवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी "आयआयबी महाफास्ट" या ऑफलाईन परीक्षेचे आयोजन केले आहे. यामध्ये 

गुणवत्ताधारक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे अंशतः किंवा संपूर्णतः फीस माफ करण्यात येणार असल्याची माहिती आयआयबी व्यवस्थापणाने दिली आहे.

आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, काटेकोरपणे वेळेचे नियोजन आणि उत्तम शैक्षणिक सुविधांचामुळे आजमितीला आयआयबी देशाच्या घराघरापर्यंत पोहोचली आहे. मागील तब्बल २३ वर्षांपासून आयआयबीचे विद्यार्थी नेत्रदीपक यश प्राप्त करत आहेत. राज्यातील कोणत्याही विद्यार्थ्याचे डॉक्टर-इंजिनिअर होण्याचे स्वप्न केवळ आर्थिक परिस्थिती, आवश्यक सुविधेमुळे धूसर न होता त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयआयबी कायमच प्रयत्नशील असते. दरम्यान, याचाच एक भाग म्हणून केवळ नांदेड आणि लातूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी पुणे, कोल्हापूर येथे, मराठवाडा-खान्देशच्या विद्यार्थ्यांसाठी औरंगाबाद आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना सोयीचे पडेल अशा अकोला येथे आयआयबी शाखेच्या स्थापना केल्या आहेत. तरी इयत्ता ११ वीतून १२ वीत जाणाऱ्या औरंगाबाद आणि अकोला शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयआयबी करियर इन्स्टिट्यूटच्या वतीने रविवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी "आयआयबी महाफास्ट" या ऑफलाईन परीक्षेचे आयोजन केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना PCB आणि PCM म्हणजेच वैद्यकीय शिक्षणासाठी असलेली मेडीकल आणि इंजिनिअरिंग साठी असलेल्या नीट, जेईईची तयारी करून घेण्यात येणार आहे. नीट, जेईई पॅटर्न नुसार ७२० गुणांची परीक्षा होणार आहे. यामध्ये गुणवत्ताधारक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे अंशतः किंवा संपूर्णतः फीस माफ करण्यात येणार असल्याने होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध केलेल्या ५० टॉप विद्यार्थ्यांची "एम्स बॅच"असणार आहे. तरी "आयआयबी महाफास्ट" परीक्षेसाठी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

///// चौकट //////

रविवारी होणाऱ्या "आयआयबी महाफास्ट" परीक्षेसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी व मॅथ विषयांचा कोणता अभ्यासक्रम ठरविण्यात आला आहे या माहितीसाठी आयआयबीच्या औरंगाबाद, अकोला शाखेत भेट द्या अथवा कॉल करा औरंगाबाद - 9604730730, अकोला - 7304730730

अथवा 

https://www.iibedu.com/FASTReg2324/ या वेबसाईटला भेट द्या असे आवाहन आयआयबीच्या वतीने करण्यात आले आहे.