श्रीक्षेत्र वडवाळीत रविवारी भंडारा महोत्सवाची सांगता; भरगच्च कार्यक्रम होणार!

पैठण; पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र वडवाळी येथील श्री लक्ष्मी बालाजी मंदिरात सोमवारपासून सुरु असलेल्या साळसिध्द बाबा श्री शेषनारायण महाराज भंडारा महोत्सवात हभप बाबुराव महाराज गिरी (इंदेगाव) यांच्या सुमधुर वाणीतील श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे भक्तीभावाने श्रवण करतांना पंचक्रोशीतील भाविक भक्त.

रविवार दिनांक ७ आॅगस्ट रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत हभप उद्धव महाराज सबलस वडुलेकर यांच्या दहिहंडी काल्याचे किर्तन व त्यानंतर भंडारा महाप्रसादाने यंदाच्या ४९ व्या भव्य महोत्सवाची सांगता होणार असून लाभ घेण्याचे आवाहन महोत्सव मंडळ व समस्त ग्रामस्थांनी केले आहे. सांगता दिवशी मराठवाड्यासह विदर्भ, पच्छीम महाराष्ट्रातील नामवंत नाग भजनी मंडळांचा पितळी कडे, भांड्यावरील वाद्यांवर पारंपरिक भजनांचा कार्यक्रम मुख्य आकर्षण असणार आहे