तुमचा दृष्टिकोन तुमची परिस्थिती घडवितो - प्रा. नितीन बानुगडे पाटील
आयआयबी करियर इन्स्टिट्युट कोल्हापूर शाखेत हजारों विद्यार्थ्यांना, पालकांना प्रेरणादायी मार्गदर्शन
औसा प्रतिनिधी : तुमच्यात अफाट सामर्थ्य आहे, शक्ती आहे; ती तुमच्या विचारांवर अवलंबून आहे.
प्रत्येक गोष्टीत चांगल शोधत जाणे याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात परिस्थिती तुम्हाला घडवत नाही तर तुमचा दृष्टिकोन तुमची परिस्थिती घडवीत असते असे प्रतिपादन प्रेरणादायी व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी रविवार, दि. २९ जानेवारी रोजी कोल्हापूर येथे केले.
"दहावी नंतर काय पूढे काय?" हा प्रश्न नेहमीच विद्यार्थी व पालकांसमोर निर्माण होतो. त्यामुळे या काळात विद्यार्थी-पालकांमध्ये निर्माण झालेला प्रश्न, करियर निवडीसंदर्भात असलेला संभ्रम दूर करण्यासाठी आयआयबी करियर इन्स्टिट्यूटच्या वतीने कोल्हापूर येथील विद्यार्थी-पालकांसाठी सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक, लेखक व प्रेरणादायी वक्ते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कोल्हापूर शहरातील प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी ग्राऊंड २५६०, बी-खसवा संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासमोर झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी आयआयबी करियर इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक दशरथ पाटील, आयआयबी लातूर चे डायरेक्टर प्रा. चिराग सेनमा, आयआयबी नांदेड शाखेचे अकॅडमीक डायरेक्टर डॉ. महेश पाटील, सल्लागार बालाजी कदम, को-ऑर्डिनेटर शेख सर, आयआयबी पुणे शाखेचे डायरेक्टर ऍड. महेश लोहारे, एस. एम. सेनमा, आणि ज्योत्स्नाबेन सेनमा, रवी सौदागर, बनवारीलाल जांगीड, सोनाली सौदागर, निलकंठ मिरकले, धनश्री मॅम, अक्षय नलदकर, महेशकुमार माने, अमित सर, सनी सर देवाशीस सर, अमोल सर, संजीव सर, मधुकर सर, राहुल सर, शिवराज सर, मुल्लानी सर, सुरज सर, राहुल कानीकर सर, कृष्णा गुडगिल्ला आदींसह संपूर्ण आयआयबी टीम उपस्थित होती. दरम्यान, विद्येची देवता असणाऱ्या सरस्वती पूजन करून व्याख्यानाची सुरुवात झाली. आपल्या मार्गदर्शनात उपस्थित विद्यार्थ्यांना उद्देशुन पुढे बोलताना प्रा. नितीन बानुगडे पाटील म्हणाले की, तुमचं "मन" हे तुम्हाला घडविणारे शक्तिशाली केंद्र आहे, यासाठी सकारात्मकता असणे आवश्यक आहे. केवळ मी सकारात्मक आहे, सकारात्मक विचार करतो त्याचबरोबर कृतीही असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आधी नियोजन करा, कारण तुम्ही काम किती करता?, अभ्यास किती करता? हे महत्त्वाचे नाही तर तर तुम्ही तुमच्या कामाचे, अभ्यासाचे नियोजन कसे करता? याच्यावर तुमचे यश अवलंबून आहे असे यावेळी व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील म्हणाले. यावेळी कोल्हापूर व परिसरातील हजारो विद्यार्थी, व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक लातूरचे डायरेक्टर प्रा. चिराग सेनमा, अकॅडमीक डायरेक्टर प्रा. डॉ. महेश पाटील यांनी तर सादिक शेख यांनी आभार व्यक्त केले.
/////// चौकट /////////
भविष्यात आपल्या यशस्वी जडणघडणीसाठी कोणत्या क्षेत्रांत करियर घडवावे हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थी-पालकांसमोर निर्माण होत असतो. दरम्यान, देशात सर्वाधिक डॉक्टर घडविणाऱ्या आयआयबी इन्स्टिट्यूटने सुरुवातीपासून आतापर्यंत विद्यार्थी, व पालक यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत आणि राबवित आहे. रविवारी, आयआयबी कोल्हापूर शाखेच्या वतीने आयोजित प्रेरणादायी व्याख्यातेप्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या केलेल्या मार्गदर्शनानंतर उपस्थित असलेल्या हजारो विद्यार्थी, पालक आणि आप्तजनांच्या चेहऱ्यावर आनंद, आत्मविश्वास आणि उत्साह दिसून आला.