शेतमजूराची विषारी औषध घेऊन आत्महत्या,
"पैठण तालुक्यातिल वडजी येथील घटना"
पाचोड/ कर्जबाजारी पणाला कटाळून एका तेहतीस वर्षीय शेतमजूरानी विषारी औषध प्रशासन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वडजी ता.पैठण येथे शनिवारी (दि.४)रोजी सकाळी नऊच्या दरम्यान उघडकीस आली.
याविषयी पाचोड पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचोड पासून जवळच असलेल्या वडजी गावातील शेतवस्तीवर परमेश्वर वीर वय ३३ रहात आहे. परमेश्वर वीर हा शेतमजूर म्हणून काम पहात आहे. परमेश्वर वीर यांनी एका खाजगी बचत गटांकडून कर्ज घेतले होते व काही हाथ उसने पैसे लोकांकडून घेतले होते लोकांचं देणे फार वाढल्यामुळे व हाताला काम मिळत नसल्यामुळे परमेश्वर वीर हवालदिल झाला होता काय करावे काय नाही काहीच सुचत नव्हते परमेश्वर हा सतत चिंतेत रहात होता शुक्रवारी रात्री परमेश्वर वीर यांनी आपल्या परिवारासह जेवण केलं व रात्री झोपी गेले व परमेश्वर वीर यांनी आपल्या घराबाहेरील पलंगावर बसून विषारी औषध घेतले व आपली जीवनयात्रा संपवली शनिवारी सकाळी परमेश्वर यांचे भाऊ उठले व परमेश्वर यांनी विषारी औषध प्राशन केलेले दिसून आले यावेळी परमेश्वर यांच्या नातेवाईकांनी तातडीने सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून परमेश्वर वीर यास मयत घोषित केले आहे.यावेळी या घटनेची माहिती पाचोड पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. यावेळी सपोनि गणेश सुरवसे पोलिस उपनिरीक्षक सुशांत सूतळे पोलिस जमादार ताराचंद घडे आदी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली व पंचनामा केला आहे. पाचोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पाचोड पोलीस करत आहे