कारंजा येथील दिल्ली वेस दुरुस्ती चे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडल्यामुळे कारंजा शहरातील रहदारीची खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे,सदर दिल्ली वेस मधून विविध शैक्षणिक शाळा,महाविद्यालय तथा बहुसंख्य कॉलोनीतील रहिवाशांना जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे,यासंदर्भात सहायक संचालक पुरातत्व विभाग नागपूर यांनी जा.क्र.स्मारके/दिल्ली/वेस/जदू ५९४/२०२२ या पत्रानुसार मा.संचालक पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय मुंबई यांना दिल्ली वेस कारंजा लाड ता कारंजा जि वाशिम या राज्य संरक्षित स्मारकाच्या ब-१ निविदा प्रक्रियेबाबत कळविले आहे,सदर पत्रानुसार ब-१ निविदा काढण्यात आलेली असून शासन निर्णयातील परिशिष्ट-१ मधील अ कंत्राटदाराचे पात्रता निकष तपासून दिल्ली वेस दुरुस्ती कामांसाठी एकूण ४ कंत्राटदाराच्या निविदा ऑनलाइन पद्धतीने या कार्यालयाला प्राप्त झालेल्या आहेत.शासन निर्णयातील परिशिष्ट-२ प्रमाणे कंत्राटदाराने सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली असता गुणांकन करण्याच्या पद्धतीनुसार कोणत्याही कंत्राटदारस ६३% पेक्षा जास्त गुण मिळत नसून सदर कामांसाठी गुणांकाच्या पद्धतीनुसार त्यांना सादरीकरणासह ७५% गुणांकण मिळणे गरजेचे असल्याचे दर्शविले आहे,दिल्ली वेस कामातील तांत्रिक बाबींची समस्या दूर करून सदर दिल्ली वेस दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी यांचे मार्गदर्शनाखाली कारंजा तहसीलदार यांचे माध्यमातून मुख्यमंत्री यांना ३१ जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले.यावेळी माजी नप गटनेते ॲड. फिरोज शेकूवाले, जाकीर शेख,सलीम गारवे, सलीम प्यारेवाले, अ.एजाज, सय्यद मुजाहिद, मेहबूब भाईं टेलर,उस्मान खान,मुन्नाभाई ठेकेदार, मो आरिफ ठेकेदार, अ नासिर,शेख रिहान, मोहसीन आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं