बदलते हवामान व शेती उत्पादनाला योग्य भाव मिळत नसल्याने वैतागलेला कर्जबाजारी शेतकरी आपल्या शेती मध्ये निरनिराळे प्रयोग करताना नेहमीच आढळतो. आणि काहीच पर्याय उरला नाही की मग आत्महत्या करतो. याला अपवाद ठरला आहे माळशिरस तालुक्यातील डोंबाळवाडीचा शेतकरी. गड्याने आपल्या डाळिंबाच्या बागेत चक्क गांजाची झाडे लावल्याचे उघड झाल्या नंतर पंचक्रोशीत त्याचीच चर्चा ऐकायला मिळत आहे.

या बाबत माळशिरस पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना गोपनीय सूत्रांकडून डोंबाळवाडी येथील शेतकऱ्याच्या शेतात एका शेतकऱ्याने गांजाची झाडे लावली असल्याची माहिती मिळाली. सदरच्या माहिती ची खातरजमा करण्यासाठी पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी सोलापूर ग्रामीण च्यापोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि शशिकांत शेळके, पोसई पुजारी, सपोफौ हनुमंत जरे, पोहेकॉ घोगरे, पोहेकॉ नवनाथ सोनटक्के, पोना स्वप्नील गायकवाड, पोना राहुल रुपनवर, पोकॉ सोमनाथ माने, चापोकॉ माने यांना सोबत घेऊन डोंबाळवाडी ता. माळशिरस येथील गणपत शिवाजी जाधव रा. डोंबाळवाडी, खुडुस ता माळशिरस जि सोलापुर यांचे शेतातील डाळिंबाचे बागेमध्ये छापा मारला.