ॲड. गोरे यांची डेक्कन शुगर टेक्नाॅलॉजीस्ट असोसिएशनच्या सदस्य पदी निवड
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
औसा प्रतिनिधी- ता:— केशेगांव (ता:— उस्मानाबाद ) येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अॅड. चित्राव गोरे यांची दि डेक्कन शुगर टेक्नाॅलॉजीस्ट असोसिएशन (इंडीया) पुणे या संस्थेच्या सदस्य पदी निवड करण्यात आली. देशातील साखर उद्दोगात अग्रगण्य असणार्या दि डेक्कन शुगर टेक्नाॅलॉजीस्ट असोसिएशनच्या (डीएसटीए) नुकत्याच त्रैवार्षीक निवडी पार पाडल्या आहेत. संस्थेच्या सन २०२२—२०२५ या नविन कार्यकारणीमध्ये राज्यातुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अॅड. चित्राव गोरे यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना प्रतिनीधी या वर्गातुन डेक्कन शुगरच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र संस्थेचे अध्यक्ष एस.बी.भड यांचेकडुन देण्यात आले आहे.अॅड. गोरे हे रोटरी क्लब उस्मानाबाद,हिंगळजाई फार्मर्स प्रोड्युसर कंपनी,उस्मानाबाद या संस्थेचे संचालक असुन राजर्षी शाहु ग्रामीण बहुउद्देशीय सहकारी पतसंस्थेचे सन २००७ ते २०१२ पर्यंत पदाधिकारी म्हणुन काम पाहीले आहे. तसेच अॅड.गोरे सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्टी स्टेट को—अॉप.क्रेडीट सोसायटी लि, यासंस्थेचे चेअरमन असुन संस्थेचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळत आहेत. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन या संस्थेच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल अॅड.गोरे यांचा कारखान्याचे वतीने व्हाईस चेअरमन हनुमंत भुसारे यांनी सत्कार केला. त्यावेळी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद ( दादा )गोरे व अधिकारी वर्ग उपस्थित होते.