यवतमाळ : यवतमाळ येथील नगर पालिकेत कार्यरत सफाई कामगारांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे. त्यांचे प्रश्न निकाली काढण्यात यावे, अन्यथा उपोषणाला बसण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्र्रेसच्या वतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आला. सफाई कामगारांना सुट्ट्या मिळत नाही. सुटींच्या दिवशी काम केल्यास त्यांना त्या दिवसाचे वेतन देण्यात यावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम सफाई योजना लागू करण्यात यावी, मृत सफाई कामगारांच्या वारसांना दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे, आदी मागण्यांच्या निवेदनात समावेश आहे.
सफाई कामगांरांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढा : अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
![](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/photos/2022/09/nerity_fee44a3aee9e14299b782afaadb5afe7.jpg)