यश मिळवण्यासाठी वाटेल तेवढे कष्ट - युवराज बिराजदार
औसा (प्रतिनिधी )- आजच्या स्पर्धेच्या युगात स्पर्धा खूप आहे. त्या स्पर्धेत टिकण्यासाठी खूप कष्ट करा,यश मिळवण्यासाठी वाटेल तेवढे कष्ट , स्टडी करा . संपूर्ण फोकस तुम्ही तुमच्या करिअर वर ठेवा कष्टाला मर्यादा नाही यशाचा पाठलाग न करता यश तुमचा पाठलाग केला पाहिजे. त्यासाठी तुमच्या मध्ये चांगली शिस्त असणं गरजेचे आहे स्वतःला शिस्त लावून द्या ,अभ्यासाला महत्व द्या , एन्जॉय करा पन एन्जॉय करत. शिक्षण घेण्यापेक्षा, शिक्षण घेत एन्जॉय करा असे प्रतिपादन भारतीय अभियांत्रिकी सेवेतील युवराज बिराजदार यांनी केले. श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी ,हासेगाव महाविद्यालयात आयोजित बी.फार्मसी आणि डी. फार्मसी नूतन विध्यार्थीच्या परिचय मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर अप्पा बावगे , कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे , पाटील ईश्वर , प्राचार्या डॉ.श्यामलीला बावगे (जेवळे ),प्रा. संग्राम देशमुख इत्यादी मान्यवर मंच्यावर उपस्थित होते.
नूतन विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळ्यात देवणी येथील रहिवाशी असलेले प्रेरणा स्रोत युवराज बिराजदार आणि त्यांचा आदर्श नूतन विध्यार्थ्यानी घेतला पाहिजे विद्यार्थ्यांनी साहेबांसारखे स्वप्न पाहावे, आणि आपन पाहिलेले स्वप्न पूर्ण करता म्हणजे आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करता आई वडिलांच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी लढा असा मौलिक संदेश प्रास्ताविक पर भाषण देताना संस्थेचे कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे यांनी दिला .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. बालाजी खवले यांनी केले . या कार्यक्रमामध्ये लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी ,हासेगाव , राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज,लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था , गुरुनाथ अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल , लातूर कॉलेज ऑफ सायन्स, लातूर ,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी,लातूर , या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विध्यार्थी उपस्थित होते.