ओसाड :ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान बुधोडा येथे स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरिश्चंद्र सुडे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. अनिता पाटील प्राचार्य रामनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आलमला व प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाटील पी. सी. पर्यवेक्षक रामनाथ विद्यालय अलमला हे उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर पी.सी. पाटील यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनाविषयी महत्त्वपूर्ण माहिती सांगितले आणि स्वामी विवेकानंदाचे विचार आपल्या आचरणामध्ये आणून सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हावे असे आवाहन केले तसेच प्रमुख अतिथी सौ.अनिता पाटील यांनीही सर्व प्रतिष्ठान मधील विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ यांचे संस्कार शिवाजी महाराजांना कसे उपयुक्त ठरले आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून एक आदर्श राजा जिजामातेने कसा घडवला याविषयी मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिश्चंद्र सुडे यांनी ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान मध्ये चालणाऱ्या सर्व उपक्रमाविषयी माहिती सांगितली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल रसाळ यांनी केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे मुख्याध्यापक कमलाकर बावगे, प्रतिष्ठान मधील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे सर्व विद्यार्थी पालक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता इतनी शक्ती हमे देना दाता या गीताने झाली.