औरंगाबाद :- दि.२६ जानेवारी (दीपक परेराव) सर्वत्र परकीय सत्तांचा उदम माजत असताना. परकीय सत्तांच्या गुलामीत,स्वाभिमान हरवलेल्या,खीतपत पडलेल्या रयतेमध्ये स्वाभिमानाची फुंकार मासाहेब जिजाऊ यांनी दिली.

आपण आपले स्वतःचे राज्य अर्थात स्वराज्य निर्माण करू शकतो ही महत्त्वकांक्षा, हे स्वप्न शहाजीराजेंसह जिजाऊंनी पाहिले. याचसाठी त्यांनी बाल शिवबाराजांची व पुढे शंभूराजांची जडणघडण केली. देशाला दोन छत्रपती देणाऱ्या मातेचे या मातीवर अनंत उपकार आहेत. स्वातंत्र्याचे बीज महाराष्ट्राच्या मातीत रुजवणाऱ्या व देशाला दोन छत्रपती देणाऱ्या थोर माता जिजाऊ आहेत.

असे प्राध्या प्रतिपादन शिवव्याख्याते घुमरे पाटील यांनी केले.राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त आज शिवसेना महिला आघाडी, संभाजीनगर च्या वतीने आयोजक जिल्हा संघटिका सौ. प्रतिभा जगताप यांनी महिला सबलीकरण व सशक्तिकरण याविषयी व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अकोला जिल्हा महिला आघाडी जिल्हा संघटिका माया म्हैसने, शिवव्याख्याते स्वप्निल घुमरे पाटील, जिल्हा संघटिका प्रतिभा जगताप यांच्या शुभहस्ते राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संपर्क संघटिका सुनीता आऊलवार, सहसंपर्क संघटिका सुनीता देव, समन्वयक कला ओझा, उपजिल्हा संघटिका अंजली मांडवकर, नलिनी बाहेती, दुर्गा भाटी, शहर संघटिका आशा दातार, भागू अक्का शिरसाठ विधानसभा संघटिका मीरा देशपांडे, लक्ष्मी नरहिरे, नलिनी महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

पुढे बोलताना शिवव्याख्याते घुमरे पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात राष्ट्रमाता जिजाऊंच्या विविध गुणांचा उलगडा करून देता सांगितले की, बारा वर्षे असणाऱ्या बाल शिवबास घेऊन जिजाऊ स्वराज्य निर्मितीचे स्वप्न मनाशी बाळगून कर्नाटक बेंगलोर मधून जेव्हा पुण्याच्या वेशीवर आल्या. त्यापूर्वीच आदिलशाही सरदाराने पुणे उध्वस्त करून टाकले होते. पुण्यातील जनता भयभीत होऊन पुणे सोडून गेली होती. पुण्याच्या वेशीवर दोन पहारीवर फुटकी कवटी, चप्पल अडकवलेले तोरण लावले होते. व बाजूस फलकावर पुण्यात वास्तव्य करणाऱ्यांचा निर्वंश होईल असे उद्गार लिहिले होते. जिजाऊंनी अंधश्रद्धेची पहार उपसून फेकून दिली.भयभीत झालेल्या रयतेस पुन्हा पुण्यामध्ये येऊन राहण्याचे आवाहन केले. व स्वतः वाडा बांधून बाल शिवबासह पुणे शहरात राहू लागल्या. यामुळे रयतेस धीर मिळाला व जिजाऊंच्या आव्हानाला प्रतिसाद देत रयत पुन्हा पुण्यात येऊन राहू लागली. पुण्याचा विकास व्हावा याकरिता जिजाऊंनी देशातील पहिली सहकारी संस्था स्वराज्य नावाने स्थापन केली. या सहकारी संस्थेमार्फत शेतकऱ्यांना बी-बियाणे व शेतासाठी आवश्यक असणारी सर्व अवजारे दिली. यामुळे पुणे लगतच्या शेतीचा विकास झाला. हवादिल झालेला शेतकरी पुन्हा आनंदाने पुणे शहरात राहू लागला. पुण्याचे पुनर्वसन करण्यात राष्ट्रमाता जिजाऊंचे अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे.जसे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते,अगदी याप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे त्यांची आई राष्ट्रमाता जिजाऊ होत्या. जिजाऊंच्या मार्गदर्शनामुळेच छत्रपती शिवाजी महाराज कल्याणकारी महान स्वराज्य निर्माण करू शकले.

यावेळी प्रा.माया म्हसने यांनी बोलतांना सागितले की राष्ट्रमाता जिजाऊनी अनिष्ट रूढी परंपरावर आळा घालण्याचे मोठे कार्य केले. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको,असे विचार महिलांमध्ये रुजवले,महिलांनी स्वाभिमानाने जगले पाहिजे. मुलींवर चांगले संस्कार करणे ही काळाची गरज आहे मुलींना उच्च शिक्षण जरूर द्या, परंतु आपली संस्कृती ही अवश्य जपा,महिलांमध्ये ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करण्याची हिम्मत असावी.अत्याचार सहन करायचा नाही अन्याय विरुद्ध पेटून उठले पाहिजे असे आवाहन केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संघटिका प्रतिभा जगताप यांनी केले. सूत्रसंचालन शहर संघटिका आशा दातार यांनी केले आभार विधानसभा संघटिका लक्ष्मी नरहिरे यांनी मांनले याप्रसंगी कविता सुरळे,सुनिता सोनवणे,राजश्री पोफळे,सीमा गवळी, अरुणा भाटी, सुकन्या भोसले,सारिका शर्मा, रोहिणी काळे, वंदना गवळी, मंजुषा नागरे, जिजा घोडके, विजया त्रिभुवन, वनमाला पटेल, जमुना ठाकूर, कमल चक्रे 

रूपाली शुक्ला, कल्पना निकाळजे, उर्मिला कुशवाह, सविता मुळे ,रवीना जाधव, मालती कल्याणकर, सविता काचरे, बेबी खंदारकर, आलका टेकाळे, संध्या केदार, संगीता टोपे, रत्नमाला रोडगे, नम्रता वाढवे, प्रियंका नरवडे, प्रीती हिवाळे, शिवलीला वनशेट्टी, सुलोचना सिंदगे, शोभा गायकवाड, विठाबाई दाभाडे, नर्मदा देशमुख, वंदना खंडागळे, सुनीता लाड, शिवकन्या शेळके, इंदू गोण, बिंद्रावती यादव, कलावती रावळकर ,रुबीना शेख, ज्योती चिखलीकर, सुनिता पाटील, ज्योती पाटील, गीता राठोड, शोभा जाधव, सुमिता डीकोंडवार, सविता मिसाळ, मनीषा खरे, प्रियंका कुरे, सविता काचरे, विठा दाभाडे, नर्मदा देशमुख बेबी खदकार, अंजना गवई, मनीषा बिराजदार, सपना पटेल, सुषमा यादगिरे आदी महिला, माता, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.