मुंबई : वृत्तपत्रात ट्रीप बाबतची जाहिरात पाहून त्यामध्ये नमूद मोबाईल नंबरवर फिर्यादी यांनी संपर्क साधला असता गुन्ह्यातील पाहिजे आरोपी पोपटभाई, रमेशभाई अशी नावे सांगणाऱ्या इसमांना संपर्क साधला व त्यांनी त्यांच्या क्लबचे मार्फत भारतात तसेच इतर देशात ट्रीपला नेण्यासाठी ऑनलाईन पैसे घेतले परंतु फिर्यादी यांना ट्रीपला नेले नाही तसेच फिर्यादी यांना पैसे परत दिले नाहीत, फिर्यादी यांनी पैशाची मागणी केली असता त्यांना परत पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगून आणखी पैसे घेऊन एकूण रू. २,१४,१००/- एवढ्या रकमेची ऑनलाईन फसवणुक केली म्हणून कस्तरबा मार्ग पो. ठाणे येथे गु.र.क्र.१०६९/२२ कलम ४२० भादवि सह ६६ (ड) IT कायदा. गुन्हा नोंद होता. कक्ष ११ ची टिम नमूद गुन्ह्याचा समांतर तपास करीत होती.

    कक्ष ११ चे पो नि भरत घोणे यांना वर नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे जनकल्याण नगर, मालवणी परिसरात असल्याबाबत खात्रीलायक माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीनुसार तात्काळ कक्ष ११ ची टिम PI घोणे, API जाधव, API पाटील, PN केणी, PN रावराणे, PN खताते व WPC गोसावी यांनी तांत्रिक व पारंपरिक तपासाचा अवलंब करून नमूद आरोपी जिग्नेश अशोक मकवाना वय ४० वर्षे, पत्ता. A/९०५, सोनाटा बिल्डिंग, जनकल्याण नगर, मालवणी, मालाड पश्चिम, मुंबई.

२. हिरेन मनीलाल सतरा, वय १७ वर्षे, पत्ता. रूम न. सुहासिनी बिल्डिंग, चराई, ठाणे पश्चिम परिसरातून ताब्यात घेतले आहे.

      आरोपींच्या अंगझडतीमध्ये गुन्ह्यात वापरलेले ०४ मोबाईल व सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत. तसेच आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी अनेक नागरिकांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

      आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई करीता कस्तुरबा मार्ग पो. ठाणे. यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.