औरंगाबाद:-(दीपक परेराव )दि. 30 डिसेंबर शुक्रवार रोजी मिनी शिर्डी म्हणून ख्याती असलेले श्री साई बाबा मंदिर संस्थान शरणापुर संभाजीनगर ची पालखी सह पदयात्रा मोठ्या उत्साहात संस्थानचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र आदमाने पाटील यांच्या हस्ते महाआरती करून शिर्डी कडे प्रस्थान झाली. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी मोठ्या जलोषात व वाजत गाजत मिरवणूक कडे ही पालखी शिर्डी येथे साईबाबा च्या दरबारात पोहचेल.पालखी काडण्याचा मुख्य उद्देश म्हणजे नवीन वर्ष सर्व साईभक्ताना सुखाच,समृध्दीच व आनंदमयी जावो व बाबांचा आशिर्वाद सदैव राहावं असे राजेंद्र आदमाने पाटील यांनी सांगितले
साईबाबा मंदिर संस्थान चे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र आदमाने पाटील यांनी पालखी मध्ये जाणारे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व साईभक्ताना पालखी चे नियम सांगून मोलाचे मार्गदर्शन केले.उपस्थित सर्व साई भक्तांनी संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र आदमाने पाटील यांचा सत्कार करून आभार मानले व गेल्या 12 वर्षांपासून इतके भव्य मंदिर उभारले व त्या माध्यमातून जी सेवा करत आहात व या अविरत सेवे साठी शुभेच्छा दिल्या. या वेळी पंचक्रोशीतील सर्व साईभक्त,पालखी समिती पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.