उच्छिल शाळेला इनर व्हिल क्लब पुणे कडून शैक्षणिक साहित्य
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
( शिक्रापूर प्रतिनिधी ) उच्छिल ता. जुन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला इनर व्हिल क्लब ऑफ पुणे प्लॅटियम यांच्या वतीने विविध शालेपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले असल्याने शाळेला मोठी मदत झाली असल्याचे मुख्याध्यापक अन्वर सय्यद यांनी सांगितले आहे.
उच्छिल ता. जुन्नर सह शिवली व कालदरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला इनर व्हिल क्लब ऑफ पुणे प्लॅटियमच्या अध्यक्षा स्नेहल चोरडीया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रम प्रसंगी मिनाजी राठोड, मंजूताई गांधी, उच्छिल ग्रुप ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच मंगेश आढारी, उपसरपंच मारुती खिल्लारी, उच्छिल शाळेचे मुख्याध्यापक अन्वर सय्यद, कालदरे शाळेचे मुख्याध्यापक दिपक विरणक, शिवली शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम भालेकर, स्मिता ढोबळे, लीलावती नांगरे, आरती मोहरे, कालदरे शाळेचे मुख्याध्यापक दिपक विरणक, शिवली शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम भालेकर, ग्रामपंचायत सदस्य बजरंग आढारी, सुवर्णा नवले, कांचन नवले, ग्रामसेविका अश्विनी साबळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद नवले, उपाध्यक्ष गणपतशेठ भालेराव, सामाजिक कार्यकर्ते गणेश नवले, अमोल नवले, सुरेश नवले, विलास आढारी यांसह आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. दरम्यान उच्छिल अंतर्गत शिवली, कालदरे व उच्छिल येथील तब्बल एकशे पंचवीस शालेय विद्यार्थ्यांना सोलर लॅम्प, दहा मार्कर बोर्ड, एक संगणक संच, वह्या, फॅन, थंडीपासून संरक्षण साठी बॉडी लोशन व व्हॅसलिन सह विविध प्रकारचे क्रीडा साहित्य, प्रत्येक इयत्तानिहाय पुस्तके, प्रयोगवह्या, चित्रकला वह्या आणि लहान मोठ्या वस्तु वाटप करण्यात आले. सदर उपक्रमासाठी सरपंच मंगेश आढारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तर यावेळी बोलताना शालेय विद्यार्थ्यांनी सदर साहित्याचा वापर शिक्षणासाठी करून भविष्यात आपल्या पालक आणि शिक्षकांची विचारधारा पुढे नेऊन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून लोकसेवा व राज्यसेवा सारख्या परीक्षेत यश संपादनकरुन मोठ्या पदावर नियुक्त व्हावे अशी अपेक्षा अध्यक्षा स्नेहल चोरडीया यांनी व्यक्त करत भविष्यातही शाळेसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोहरे यांनी केले तर प्रास्ताविक व स्वागत शाळेचे मुख्याध्यापक अन्वर सय्यद यांनी केले आणि तुकाराम भालेकर यांनी आभार मानले.